Posts

वारी एक अद्भुत सोहळा 🙏🚩

Image
Gayatri Mokashi महाराष्ट्राविषयी बोलताना इरावती कर्वे यांनी असं म्हंटलय की, "वारीला येणाऱ्या लोकांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र" . पंढरीच्या वारी वेगळी याचा प्रत्यय ठाई ठाई येतो. म्हणून 'एक तरी वारी अनुभवावी असं म्हटलं जातं'. लाखो वैष्णवांचा सोहळा इंद्रायणीच्या काठी जमतो आणि "नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळिया, सुख देईल विसावा रे, तेने जन केला खेळीया रे." असं गात गात विठू नामात तल्लीन होत पंढरीच्या वाटेवर हा मेळा चालायला लागतो.पंढरीच्या वाटेवर चैतन्य फुलून येतं.           इंद्रायणीच्या काठी जगद्गुरु तुकोबारायांच्या आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊलींच्या पालखी प्रस्तानादिवशी लाखो वारकरी फुलून येतात. प्रस्थान सोहळा दिवशी देहू आणि आळंदी मध्ये नजर पडेल तिथे फक्त वारकरी पहायला मिळतात. ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात होत असलेला आनंद पाहायला मिळतो. हाच तो दिवस असतो ज्या दिवशी इंद्रायणी उत्सव पाहात असते. आनंदाचे डोही आनंद तरंग अशा भावनेने वारकरी बंधू इथे नाचताना दिसतात.          पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असते. दुपारी देऊळवाड्यात दिंड्या येण्यास सुरुवात